dr.satish best web design developer for mac

हरळी बुद्रुक ग्रामपंचायत :

हरळी बुद्रुक हे गांव गडहिंग्लज तालुक्यापासुन 6 कि.मी. अंतरावर असुन गडहिंग्लज ते चंदगड मार्गावर व हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसले आहे. हिरण्यकेशी नदी बारमाही वाहते त्यामुळे गावाला मुबलक पाणी मिळत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चा-याचा प्रश्न मार्गी लागला आहे. हिरण्यकेशी नदीवर  कोल्हापूरी बंधारा असून हरळी बु ते इंचनाळ व त्या भागातील गावांच्या वाहतुकीची सोय झाली आहे. इंचनाळ येथे स्वयंभु गणेश मंदीर असून हरळी बु गावचे तसेच शेजारी गावालगतच्या भाविकांना या बंधा-यामुळे गणेश दशर्नाचा मार्ग सुलभ झाला आहे. येथील ग्रामपंचायतीने गावात रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शैक्षणिक, इ. सुविधा  उपलब्ध करुण दिल्या आहेत.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

हरळी बुद्रुक ग्रामपंचायत ही 1958 सालापासून कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. हगणदारी मुक्त गाव, आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, हे पुरस्कार मिळाले आहेत.

सरपंच
सौ.दिपाली संदीप लोहार

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री.प्रदीप नारायण पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
कु. रेश्मा हिंदुराव मेटील

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Harali Budruk Grampanchayat
A/p Harali Budruk Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone : 7057413344
Office : 02327-250150